नंदुरबार l प्रतिनिधी
घरातील सर्व लोक तुलाच मदत करतात तुलाच गाडी घेवून दिली आहे मलाही गाडी पाहिजे असे सांगितल्याचा राग आल्याने लहान भावाने मोठ्या भावाला महिंद्रा मॅक्स वाहनाने ठोस मारून खून केल्याची घटना काठीचा निंबीपाडा ता . अ.कुवा येथे घडली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
काठीचा निंबीपाडा ता . अ.कुवा येथे राहणाऱ्या अजय सायसिंग पावरा (वय – २८) याने त्याचा लहान भाऊ विशाल सायसिंग पावरा याला सांगितले की,
घरातील सर्व लोक तुलाच मदत करतात तुलाच गाडी घेवून दिली आहे मलाही गाडी पाहिजे असे बोलुन विशाल सायसिंग पावरा यास हाताबुक्यांनी मारहाण करून तेथून काठी रस्त्याकडे शिवीगाळ करत निघून गेला.
या घटनेचा राग आल्याने विशाल सायसिंग पावरा याने त्याच्या मालकीचे वाहन महिंद्रा मॅक्स (MH – १६ R- ४२६०) हे चालवून गुन्हयातील अजय सायसिंग पावरा यांना जोरात ठोस मारून देवून जिवे ठार मारले.
याप्रकरणी सायसिंग जेगला पावरा रा. काठीचा निंबीपाडा ता . अ.कुवा यांच्या फिर्यादीवरून विशाल सायसिंग पावरा रा.काठीचा निंबीपाडा ता . अ.कुवा यांच्या विरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोसई जितेंद्र वाघ करीत आहेत.