नवापूर l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील चितवी गटाची पोटनिवडणुकीत छाननी अंती ६ वैद्य ठरविण्यात आले तर ५ अवैद्य ठरविण्यात आले आहे.
नवापूर तालुक्यातील चितवी गटाची पोटनिवडणुकीची प्रक्रिया दि १७ मे २०२२ पासुन लागली आहे.यात दि २३ मे रोजी नामनिर्देशन पञ भरण्याची अंतिम तारीख होती.
व दि २४ मे रोजी प्राप्त नामनिर्देशन पत्राची छान सकाळी ११ वाजता निवडणुन निर्णय अधिकारी उपजिल्हाघिकारी स.स.प्र नंदुरबार निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती कल्पना निळे-ठुबे,तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या दालनात करण्यात आली.
यात किसन रतीलाल गावीत (अपक्ष), निलेश नथ्थु गावीत(अपक्ष), रविंद्र नकट्या गावीत(अपक्ष), राजेंद्र सुरेश गावीत)(अपक्ष), सुनिल सुरेश गावीत(इंडियन नँशनल कॉग्रेस), सोमु रावजी गावीत(कॉग्रसे पक्ष) या सर्वाचे अर्ज वैद्य ठरविण्यात आले.
यावेळी नायबतहसिलदार जितेंद्र पाडवी आदी उपस्थित होते.यात ११ उमेदवारानी नामनिर्देशन पञ भरले होते यात ६ वैद्य ठरविण्यात आले तर ५ अवैद्य ठरविण्यात आले आहे.