म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील वडाळी येथे प्लास्टिकच्या अती वापरामुळे सतत प्रदुषण वाढत आहे त्याचा पशु पक्षांनाही खुपच त्रास होत आहे त्याचे विघटन लवकर होत नसल्याने जमीनही नापीक होत आहे म्हणुनच येथील जय श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघ व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला जेष्टनागरिक संघ यांनी नुकतीच मिटिंग घेऊन सभासदांनी कॅरी बॅग न वापरण्याची प्रतिज्ञा घेतली तसेच या वेळी शासनाच्या विविध योजनेचे फॉर्मही मान्यवरांचा हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष फेसकॉमचे सचिव बी. एन.पाटील होते, तर प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष ॲड. अश्विनी जोशी ,जायन्ट्सचे फेडरेशन अधिकारी माणक चौधरी,तालुका महिला अध्यक्ष रेश्मा पवार,राष्ट्रवादी चे ग्रामीण ज्येष्ठनागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप चौव्हाण, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी डी.जी.मोरे ,क्षेत्रीय अधिकारी राहुल पवार, ज्येष्ठनागरिक संघाचे जनरल सेक्रेटरी मणीलाल पाटील,आनंदराव विसपुते व श्रीराम संघाचे अध्यक्ष अरविंदगीर गोसावी व महिला संघाच्या मीराबाई महाजन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व प्रथम म. जोतीबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन
करण्यात आले. या नंतर सभासदांना मान्यवरांचे हस्ते विविध योजनेचे फॉर्म वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ॲड. अश्विनी जोशी म्हणाल्या ज्येष्ठनागरिकांना आपल्या मुलांकडून त्रास होत असल्यास न्यायालयात जाऊन न्याय मागण्याचा अधिकार आहे. ही माहिती मुलांना सुनांना होण्यासाठी त्यांनाही मिटींगला बोलवत चला तेव्हाच त्यांना कायदा कळेल.
माणक चौधरी यांनी सांगितले की सरकारने इपीएस 95 पेंशनधारकांची अनेक वर्षांपासूनची पेंशन वाढची मागणी त्वरित पूर्ण केली पाहिजे सरकारने कर्मचाऱ्यांचा एव्हढाही अंत पाहु नये.
राहुल पवार यांनीही मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात बी एन.पाटील यांनी ज्येष्ठनागरिकांच्या विविध योजनांची माहिती व फॉर्म कसा भरावा हे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रताप चव्हाण यांनी तर सूत्रसंचालन मणीलाल पाटील यांनी व आभार आनंदराव विसपुते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सभासदांनी परिश्रम घेतले.








