नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे मा.आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय संपादन केले.
नंदुरबार तालुक्यातील बहुचर्चित कोपर्ली येथील विकास सोसायटी निवडणूक मा. आ.चंद्रकांत रघुवंशी तसेच जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नवीन बिर्ला यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलचा माध्यमातून विकास सोसायटीची निवडणूक लढविली.
अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या शिवसेना पक्षाचे अकरा उमेदवारांना घवघवीत यश मिळविले. १३ जागांपैकी २ जागा या अवघ्या एक तसेच तीन मतांनी पराभव झाला.परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सरपंच तसेच मागील काळात चंदू भैया यांचे खंदे समर्थक असलेल्या
सुभाष सीताराम बिर्ला यांचे भाऊ संदीप सिताराम बिर्ला व त्यांच्या पत्नी सौ.आशा संदीप बिर्ला यांनी या निवडणुकीत डॉ. विजयकुमार गावित यांच्या पॅनलतर्फे निवडणूक लढवल्याने गावात मोठी चुरस निर्माण झाली होती. यात विजयी उमेदवार यांनी शिवसेनेच्या सर्वच तळागाळातील कार्यकर्त्यांची मनपूर्वक आभार मानून सर्वांना पेढे देत विजयाचा आनंद साजरा केला.
यावेळी तांबोळी वैशाली योगेन्द्र, मिनाबाई दिलीप बिर्ला, ताराचंद भिका भोई, चिंधा गोरख पवार, एकनाथ रामचंद्र अहिरे, इरफान शब्बीर खाटीक, अशोक महादू चव्हाण, गुलाब अब्बास पिंजारी, खुशालचंद्र गणपती बिरला, प्रवीण छगन मराठे, राजेंद्र मुरलीधर वंजारी हे उमेदवार विजयी झाले.
या निवडणुकीत पक्षाचे सर्व तळागाळातील कार्यकर्ते यांचे योगदान महत्वाचे होते त्यात रवींद्र रघुनाथ चौधरी, अशोक तांबोळी, सिताराम अहिरे, सागर इंदानी, जितू राजपूत, बाला बिर्ला, सहिद पिंजारीयांचा सह सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांचा विजयश्री मोठा वाटा आहे