Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पोलिसांची मोठ्ठी कारवाई : 15 गुन्हे उघड, आंतरराज्यीय टोळीतील तिघांना अटक

Mahesh Patil by Mahesh Patil
May 22, 2022
in क्राईम
0
वडाळी – काकर्दा रस्त्यावर अनोळखी इसमाच्या मृत्यू ; सारंगखेडा पोलिसांचे ओळख पटविण्याचे आव्हान

नंदूरबार l प्रतिनिधी

दुकानांचे शटर उचकावून चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मध्य प्रदेश राज्यात जावून अटक केली असून तीन आरोपीतांसह 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करुन 15 गुन्हे उघड केले आहे

मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील शहादा , सारगंखेडा व म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील ग्रामीण भागात असलेल्या दुकानांचे शटर उचकावून चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने नागरिक दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते .

म्हणून पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा पध्दतीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता , नंदुरबार जिल्ह्यातील शहादा , सारंगखेडा व म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत शटर उचकावून चोरीचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नव्हते .

पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणे हे मोठे आव्हान होते . त्याअनुषंगाने ग्रामीण भागातील चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक श्री . पी . आर . पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले .

वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा , सारंगखेडा व म्हसावद पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण , चोरीची पध्द्त यांची इत्थंभूत माहिती घेवुन रेकॉर्डवरील ,

मालमत्तेविरुध्दच्या गुन्ह्यातील जेलमधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून होते . तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते .

त्यातच दि . 3 मे रोजी सकाळी 5. 30 वाजे दरम्यान मंदाणा ता- शहादा येथील अंगणातुन मोटार सायकल तसेच साक्षीदार यांचे कापड दुकानातील व मेडीकलमधील कपडे रोख रुपये ,

शिवाजी नगर मंदाणा येथील घरातील रोख रुपये सोन्या चांदीचे दागिने व मोबाईल कोणीतरी 25 ते 30 वर्ष वयोगटातील इसमांनी दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश करुन

घरफोडी केली म्हणून अमोल शालीग्राम साळुंखे यांनी शहादा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिल्याने शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .

दि.3 मे रोजी शहादा तालुक्यातील मंदाणा गावात एकाच रात्रीतून दोन दुकानांचे शटर उचकावून चोरी , एक मोटर सायकल चोरी , एका घराचा कुलुप तोडुन चोरी करणे अशी घटना घडली .

सदर गोष्टीची पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली . तसेच सदरची घटना म्हणजे पोलीसांना चोरट्यांकडून एक प्रकारे जणू आव्हानच होते .

दि. 17 मे रोजी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , शहादा , म्हसावद व सारंगखेडा परीसरातील दुकानांचे शटर उचकावून चोरी करणारी टोळी ही नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या बडवानी जिल्ह्यातील कालाखेत व धार जिल्ह्यातील डोंगराळ भागातील आहे .

पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सदरची बातमी स्थानिक गुन्हे शाखेला सांगून स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले .

त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मध्य प्रदेश राज्यातील बडवानी येथे गेले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेश राज्यातील पाटी पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोकराटा , आमली , कालाखेत , गोलपाटीबैडी इत्यादी गावांच्या पाड्या पाड्यांवर स्थानिक पोलीसांच्या मदतीने जावून येथे 3 ते 4 दिवस मुक्काम करुन मिळालेल्या बातमीमधील

संशयीत इसमांच्या घराच्या परीसरात वेषांतर करुन माहिती प्राप्त केली असता मिळालेली माहिती खात्रीशिर असलेबाबत समजले . त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी एकाच वेळी तिन्ही संशयीत आरोपीतांच्या घरी धाड टाकुन तिन्ही संशयीत आरोपीतांना ताब्यात घेण्याबाबत नियोजन केले .

त्याप्रमाणे दि. 19 मे रोजी मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्रीच्या अंधारात डोंगर दऱ्यांमधून सतत 16 कि.मी. पायपीट करुन एकाच वेळी न्हावड्या फळी , बोकराटा येथील संशयीतांच्या घरी अचानक छापा टाकुन

तुकाराम मास्तरीया वास्कले ( ववेलका ), संना रामसिंग वास्कले ( वालका ), समदर रामसिंग वास्कले सर्व रा . मु . न्हावड्या फळी , कालाखेत पोस्ट बोकराटा ता . पाटी जि . बडवानी म.प्र . यांना ताब्यात घेतले.

तिन्ही संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेत आणुन विचारपुस केली असता , तुकाराम वास्कले याचे वडील बडवानी जिल्हा कारागृहात खूनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असतांना संना व समदार यांची ओळख मध्य प्रदेश राज्यातीलच धार जिल्ह्यातील नवलसिंग धरमसिंग नोरद्या, रायसिंग यांच्याशी झाली .

कालांतराने तुकाराम वास्कले याचे वडील शिक्षा पूर्ण भोगून घरी आल्यानंतर नवलसिंग, धरमसिंग, नोरद्या, रायसिंग हे समदर वास्कले यांच्या मदतीने मागील 9 ते 10 महिन्यात त्यांनी शहादा , म्हसावद , सारंगखेडा हद्दीतील छोट्या छोट्या गावांमध्ये शटर उचकावून चोरी व मोटर सायकल चोरीचे केल्याची कबुली दिली .

शहादा , म्हसावद , सारंगखेडा पोलीस ठाण्यांचा गुन्हे अभिलेखावरील 9 घरफोडी व 6 मोटर सायकल चोरी असे एकुण 15 गुन्हे उघडकीस आलेले आहेत .

ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही आरोपीतांना चोरी केलेल्या गुन्ह्यांमधील मुद्देमालाबाबत विचारपुस केली असता दि. 3 मे रोजीच्या मंदाणा येथील चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालापैकी 35 हजार रु . कि . एक हिरो कपनीची आय स्मार्ट स्प्लेंडर मोटर सायकल , 30 हजार रुपये किमतीची एक हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल ,

वडाळी , सारंगखेडा येथील मोबाईल दुकानाच्या चोरीतील 27 हजार 477 हजार रुपये किमंतीचे 6 मोबाईल , 57 हजार रु.किं.च्या 5 साड्या , 2600 रु . रोख असा एकुण 1 लाख 777 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करुन हस्तगत करण्यात आला आहे .

तसेच चोरी केलेल्या गुन्ह्यांमधील चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व मोटर सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी नवलसिंग भिल, धरमसिंग भिल , नोरद्या, रायसिंग सर्व रा . कुक्षी जि . धार मध्य प्रदेश यांच्याकडे असल्याचे सांगितले .

लवकरच वरील चारही आरोपीतांना ताब्यात घेवून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले .

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक , नंदुरबार पी . आर . पाटील , पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , पोलीस हवालदार दिपक गोरे , पोलीस नाईक मोहन ढमढेरे ,

पोलीस कॉन्सटेबल विजय ढिवरे , दिपक न्हावी , अभिमन्यु गावीत , शोएब शेख , रमेश साळुंखे तसेच पाटी पोलीस ठाण्याचे ASI केशव यादव , पोलीस हवालदार बलविरसिंग मंडलोई यांच्या पथकाने केली आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार डहाणू बसचा अपघात सुदैवाने जीवितहानी टळली

Next Post

भोमदीपाडा येथे चिंचपाडाचर्च कौन्सिलचे ५१ वे तीन दिवसीय तरुण संमेलनाचा समारोप

Next Post
भोमदीपाडा येथे चिंचपाडाचर्च कौन्सिलचे ५१ वे तीन दिवसीय तरुण संमेलनाचा समारोप

भोमदीपाडा येथे चिंचपाडाचर्च कौन्सिलचे ५१ वे तीन दिवसीय तरुण संमेलनाचा समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

‘समुत्कर्ष’ ला राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार

October 17, 2025
पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group