शहादा l प्रतिनिधी
शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातर्फे “डिजिटल इंडिया” या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षपूर्ती निमित्त भारत सरकारतर्फे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी नवसारी येथील नारण लाला एम.बी.ए. कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक डॉ.विशाल कुमार माळी तसेच डॉ.दिव्येशकुमार गांधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, भारतीय समाजाचे सशक्तिकरण तसेच अर्थव्यवस्थेचे ज्ञान इंटरनेटमुळे होऊ शकते. तसेच दैनंदिन व्यवहारामध्ये इंटरनेट चा उपयोग कसा करता येतो, त्याचे फायदे काय या विषयावर सविस्तर माहिती दिली.
कार्यशाळेत 300 पेक्षा जास्त विद्यार्थी – विद्यार्थिनीनी सहभाग नोंदविला. सदर कार्यशाळेसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील,
शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील,अकॅडमिक डीन डॉ. डी.एम. पटेल यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इलेक्ट्रिकल विभागाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.