नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथे रात्री ठीक काल दि.२० मे रोजी ८.३० मिनिटाच्या सुमारास दोन अज्ञात बालके फिरतांना आढळून आले. प्रथमदर्शनी त्या ठिकाणी उपस्थितांच्या लक्षात आले की ही बालके बोरद येथील नसून दुसऱ्या ठिकाणाची असावीत.कारण ते दोघंही सैरभैर झालेली होती.त्यांच्या नजरा सतत काहीतरी शोधत होत्या.
उपस्थित ग्रामस्थांच्यावतीने त्यांना विचारपूस करण्यात आली असता त्यांना इकडची भाषा समजत नव्हती ते पावरा समाजातील भाषेत बोलत होती .त्यामुळे त्यांच्याकडून कुठलीच माहिती मिळू न शकल्याने मंगेश पाटील यांनी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधला असता कर्मचारी आपल्या कामानिमित्ताने तळोदा येथे असल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे तळोदा येथे संपर्क साधला असता तळोदा पोलिक स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक केलसिंग पावरा यांनी लागलीच बोरद आउट पोस्टच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून आपले वाहन बोरद येथे पाठवले.
तत्पूर्वी बोरद येथील पत्रकार मंगेश पाटील, इमाम तेली, जलीस तेली, इस्माईल तेली, रवींद्र कोळी अविनाश कोळी, मनोज पाटील, अरुण पाटील, दिलीप शिंपी, गिरधर पाटील, संजीव मोरे, मका पावरा यांनी आलेल्या मुलांशी संपर्क केला असता त्यांची भाषा अवगत न झाल्याने त्यांना कुठल्याच प्रकारची माहिती मिळू शकली नाही.
मुलांचे चेहरे अत्यंत कोमेजलेले दिसल्याने त्यांना रात्री उशिरापर्यंत जवळच ठेवण्यात आले.आणि इस्माईल तेली तसेच इमाम तेली यांच्या माध्यमातून त्यांना जेवण खाऊ घालण्यात आले.
तळोदा पोलीस स्टेशन या ठिकाणी संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली. बोरद येथील कॉन्स्टेबल विजय विसावे व तुकाराम पावरा यांच्या माध्यमातून त्यांना तळोदा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले.व त्यांच्याकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.
त्यावेळी त्यांची भाषा अवगत असलेल्या पोलीस कर्मचार्यांकडून त्यांच्या गावाची माहिती घेण्यात आली व त्यांच्या पालकांशी संपर्क करण्यात आला. रात्र बरीच झाल्याने साधारणतः १२.३० टाइम झाल्याने त्यांचे पालक या ठिकाणी हजर होऊ शकले नाही.
त्यामुळे आपली मुलं सुरक्षित असल्याची भावना त्यांच्या पालकांना देण्यात आली. व त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी तळोदा येथे येण्याचे आवाहन करण्यात आले.
या आवाहनाला प्रतिसाद देत पालकांनी दि.२१ रोजी ठीक दुपारी १ वाजता तळोदा पोलीस स्टेशन गाठले व पोलिसांना आपली ओळख पटवून देत आपण या मुलांचे पालक असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचबरोबर व जाबजबाब नोंदविल्यानंतर त्यांना पालकांच्या हवाली करण्यात आले.
तत्पूर्वी आलेल्या पालकांकडून या मुलांबाबत माहिती जाणून घेतली असता मुलांचे आई-वडील शेती कामानिमित्त अनरद बारी ता.शहादा येथे आले असून ते मूळचे मध्यप्रदेश या राज्यातील असून बायगोर ता. पानसमेल जि. बडवाणी येथील होत.
ते अनरद बारी येथील शेतावर रखवालदार म्हणून काम करत होते. त्या ठिकाणी जवळच लग्न होते. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही या मुलांना दळण दळण्यासाठी गिरणी वर पाठविले त्यांच्याकडे दळण दळण्यासाठी पैसेही दिले परंतु सदर मुलेही घरी परत आली नाहीत.
शोध घेतला असता असे कळाले की लग्नात हे मुलं हजर होते आणि त्या ठिकाणाहून ते परस्पर पसार झाले. शोध घेण्याचा प्रयत्न केला असता मुलं मिळून आले नाहीत.
मुलांबाबत पालकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मनीष वजऱ्या वासकले वय साधारणतः ७ वर्ष,व जतन आंबरसिंग भोसले वय साधारणतः ९ वर्ष ही दोघंही मोटर सायकल स्वरास हात देऊन शहादा पर्यंत पोहोचले आणि त्याच बरोबर पुन्हा मोटरसायकल द्वारे बोरद या ठिकाणी पोहोचले.
बोरद येथे ग्रामस्थांनी यांना सैरभर झाल्याचे पाहून त्यांना जवळ बोलावले व सर्व काही विचारपूस केली परंतु त्यांची भाषा अवगत नसल्यामुळे लागलीच पोलीस कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून तळोदा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या हवाली त्यांना करण्यात आले.
यामुळे बोरद ग्रामस्थ व तळोदा पोलीस स्टेशन यांनी यांच्या सहकार्याने बालकांना दुसऱ्या दिवशी लागलीच त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले यामुळे बोरद ग्रामस्थ पोलीस कर्मचारी बोरद बिटचे हवालदार गौतम बोराडे, विजय विसावे,तुकाराम पावरा यांनी माणुसकीचे खरे दर्शन घडवले.त्यांच्या या कार्याबद्दल तळोदा येथील पोलीस अधिकारी केलसिंग पावरा यांनी बोरद ग्रामस्थ व आपल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.