नंदुरबार l प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसीच्या राजकीय आरक्षणाची हत्या केली आहे,त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 11 वाजता उपोषण होणार आहे.
सदर उपोषणाला नंदुरबार विधानसभा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खा.डॉ.हिना गावित, आ. डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी, माजी आ. शिरिष चौधरी, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, राजेंद्रकुमार गावित, दिपक पाटील,भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस निलेश माळी,भाजपा ओबीसी मोर्चा नंदुरबार जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे,
भाजपा ओबीसी मोर्चा नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती. अनामिका चौधरी, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस प्रा. प्रकाश गवळे तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापती व सदस्य तसेच नगरसेवक सर्व मंडळ अध्यक्ष,
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी ओबीसी मोर्चा पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित राहणार आहे,असे भाजपा ओबीसी मोर्चा नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल शेंडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.