नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खूर्दे येथील चैत्राम मव्हाळ येथील युवक एक हात व एक पायाने पुर्ण दीव्यांग असुन स्वतःचा रोजचा उदरनिर्वाहसाठी दररोज साईकलीवर आजुबाजुच्या गावात जावुन
कटलरीचा व्यवसाय करतो.त्याला जिल्हा परीषद समाज कल्याण विभागाच्या 5 टक्के सेस निधि अंतर्गत त्याला झेरॉक्स मशिन मिळाले.पोटासाठी रोजचा फिरणं आता तर बंद होईल या विचाराने त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खूर्दे येथील चैत्राम दिलीप मव्हाळ हा युवक जन्मापासूनच एका हात व एका पायाने दिव्यांग आहे.त्याचे वडील मजुरी करतात.तर काही वर्षांपूर्वी त्याच्या आईचा अपघातात मृत्यू झाला होता.वडिलांना हातभार लावण्यासाठी हा युवक उमर्दे खुर्दे परिसरातील विविध गावात तीन चाकी सायकलद्वारे १० किमी चा प्रवास करून कटलरीचा व्यवसाय करत होता.
चैत्राम दिलीप मव्हाळ या लाभार्थ्याच्या अर्ज गावातील दिगंबर जाधव या युवकाने जिल्हा परिषद व पंचायत समिती नंदुरबार येथील समाज कल्याण विभागाकडे सादर केलेला होता. नंदुरबार तालुका पंचायत समितीचे मा सदस्य दिपक मराठे व उमर्दे खुर्दे येथील दिगंबर जाधव यांच्या पाठपुरवठ्यामुळे खऱ्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळाला.
यावेळी जिल्हा परीषद समाज कल्याण विभागाच्या 5 टक्के सेस निधिअंतर्गत जि. प.चे उपाध्यक्ष ॲड.राम रघुवंशी यांच्या हस्ते चैत्राम दिलीप मव्हाळ याला झेरॉक्स मशिनचे वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,मा.सभापती विक्रमसिंग पाडवी पं.स.चे मा सदस्य दिपक मराठे, दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.