म्हसावद l प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन संघटना मोलगी शाखेतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,20 मे रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजे दरम्यान मोलगी येथील ईरा किड्स स्कूल येथे शाखेच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीर यशस्वी संपन्न झाले.
शहादाचे रविंद्र पाटील यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन हा विषय स्पष्ट केला. त्या नंतर श्रध्दा अंधश्रद्धा विषयाची मांडणी विनायक सावळे यांनी केली. नंतर चमत्कार सादरीकरण व त्या मागील विज्ञान सहप्रयोग किर्तीवर्धन तायडे व वसंत वळवी, नंदुरबार यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर देव आणी धर्म व संघटना कार्यपद्धती विषयाची मांडणी विनायक सावळे यांनी केले. नंतर
प्रश्नोत्तरे, सामुहिक चर्चा, व्यक्तिगत अनुभव व प्रशिक्षणार्थींचे मनोगत , आभार मानून प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले.
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी शाखा अध्यक्ष रायसिंग पाडवी, कार्याध्यक्ष शितल वसावे, सुमित्रा वसावे (कार्याध्यक्ष- अक्कलकुवा) ब्रिजलाल पाडवी प्रधान सचिव यांच्यासह सर्वच उपस्थित होते.
मोलगी परीसरातील स्त्रियांवर होणारे मानसिक मानसिक अत्याचार,अंधश्रद्धा, व डाकीण म्हणून हिणवल्या जाणाऱ्या स्रियांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या महाराष्ट्र अनिस शाखा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न झाली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन शाखा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरात प्रमुख मार्गदर्शन करणारे राज्य सरचिटणीस विनायक साळवे यांनीअंधश्रद्धा यांनी धर्म आणि अंधश्रद्धा याविषयावर मार्गदर्शन केले. तसेच रविंद्र पाटील यांनी वैज्ञानिक दृष्टिकोण याविषयी माहीती दिली.
किर्तीवर्धन तायडे आणि वसंत वळवी यांनी उपस्थित कार्यकर्ता समोर मंत्राने दिवा पेटवणे,मंत्राने अग्नि प्रज्वलित करणे, गडव्यात भूत गाडणे,चमत्कारीक तिर्थाचा कलश,वासावरुन वस्तु ओळखणे,जिभंतुन त्रिशूल आरपार करणे,कागदावर भूत जाळणे, चमत्कार सादरीकरण केले.
तसेच सुमित्रा वसावे हीने अंधश्रद्धेवर गाणी सादरीकरण केले झाली. यावेळी रामजी पाडवी व रायसिंग पाडवी यांनी त्यांचे अंधश्रध्देबद्दल अनुभव देवुन त्यांचे मनोगत व्यक्त केले.
यावेळी अनिस शाखा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराच्या विचार मंचावर अंधश्रद्धा राज्य सरचिटणीस विनायक साळवे, अक्कलकुवा तालुक्याचे अनिसच्या कार्याध्यक्षा समित्रा वसावे, अंनिसचे मोलगी परिसराचे अध्यक्ष रायसिंग पाडवी,अनिसच्या कार्याध्यक्ष शितल वसावे, अनिसचे प्रधान सचिव ब्रिजलाल पाडवी,
अनिसचे युवा विभाग कार्यवाहक पाशा वसावे, किर्तीवर्धन तायडे,रायसिंग पाडवी,आपसिंग वसावे संदिप वळवी,सुनिल वसावे,देवजी वसावे,रामजी पाडवी,सूर्यकांत आगणे,रविंद्र पाटील,वसंत वळवी,श्रीकांत बाविस्कर,सा-या पाडवी,पाच्या वसावे,आश्विन वसावे,प्रतापसिंग पाडवी,आर जे पाडवी,जे. आय.वसावे आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र अनिस शाखा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे सूत्रसंचालन शितल वसावे तर आभार प्रदर्शन ब्रिजलाल पाडवी यांनी मानले.