नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य गवळी समाज संघटनेचे जळगांव जिल्हा युवा कार्याध्यक्ष तथा गवळी समाज एकता बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष उमाजी खंडू गठरी(गवळी) यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगांव येथील राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था अल्पबचत भवन येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.उमाजी खंडू गठरी(गवळी) यांनी कोरोना काळात गरीब लोकांना अन्न पुरविले तसेच सामाजिक व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हा पुरस्कार जळगांव महानगरपालिका उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी जळगांव महानगरपालिका महापौर जयश्री महाजन,संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ संदीपा वाघ, ज्ञानेश्वर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांचे महाराष्ट्र राज्य वीरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष भिमराज घुगरे, युवा प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णा गठरी,जळगांव जिल्हा अध्यक्ष दीपक जोमीवाळे,प्रकाश लंगोटे,शिवाजी औरंगे, भावडू नामदे, नितीन सपके,शंकरराव काटकर, नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष महादू हिरणवाळे, जिल्हा सचिव अशोक यादबोले यांनी अभिनंदन केले आहे.तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहे.