Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा, कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती पोलिस दलाने सत्यात उतरवल्या

team by team
May 17, 2022
in राज्य
0
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून, फक्त लढ म्हणा, कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती पोलिस दलाने सत्यात उतरवल्या

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबारात पुन्हा पोलीसांतल्या माणुसकीची दिव्य प्रचिती आली असून दिव्यांगास त्यांनी आधार दिला
पोलीसांबद्दलच सर्वसामान्यांच्या मनात फारसे चांगले मत नसते परंतु नंदुरबार पोलीसांनी मात्र याला वेळोवेळी छेद दिला आहे.
श्रेयस दिलीप नांदेडकर वय ३५.शिक्षण बारावीपर्यंत तो जन्मतःच संपूर्ण दिव्यांग! हात व पाय ठार लुळे.असून नसल्यासारखेच..उभा रहाता येत नसल्याने सतत बसूनच रहावे लागते. दुसऱ्यांनेच उचलून न्यावे लागते. बोलतांना अडखळत बोलतो.परिस्थिती अत्यंत गरीब.नंदुरबार पोलीसांच्या भाड्याच्या गाळ्यात त्याचे वडील दिलीप नांदेडकर झेरॅाक्स मशीनवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे. श्रेयसच्या एका हाताची थोडीशी हालचाल होते, परिस्थितीला शरण न जाता याच एका हाताने तो वडिलांना झेरॅाक्स काढायला परवापर्यंत मदत करायचा.
अचानक परवा १४ एप्रिलला श्रेयसचे वडील हार्ट ॲटॅकने गेले आणि दिव्यांग श्रेयसच्या कुटुंबावर नियतीने दुसरा निर्दयी आघात केला. स्वतःलाच उभे रहाता येत नाही तेथे या वयात आईचा सांभाळ कसा करायचा या विचारांने तो सैरभैर झाला. आतापर्यंत वडील त्याला दुकानापर्यंत पाठीवर उचलून आणायचे, आता पुढे काय? जीवनाची लढायचे तर आहेच पण कसे? दिलीप नांदेडकरांचा संसार त्यांच्या पश्चात उघड्यावर पडला.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी श्रेयसला बालावून घेतले. आईसह तो कार्यालयात आला.
पुढे काय ? विचारले तर तो म्हणाला “ काही नाही..लढणार!” मग काय पोलीस अधीक्षक यांच्या एका हाकेसरशी नंदुरबार पोलीसांची टीम कामाला लागली.पुन्हा एक मोडू पाहणारा संसार उभा करायचा असा विचार पुढे आला. पोलीस अधीक्षकांसह अपर अधीक्षक विजय पवार, पो.नि.कळमकर व त्यांच्या सहकाऱ्यानी निधी जमा केला.तब्बल ६३ हजार रु. जमा झाले. या रकमेचा चेक थरथरत्या हातांनी स्विकारत श्रेयसने नंदुरबार पोलीसांचे आभार मानले. रकमेतून आता श्रेयस स्वताच्या तिनचाकी बाईकवर झेरॅाक्सच्या दुकानात जाऊ शकेल. जन्मताच दुर्बल असलेल्या श्रेयसच्या पायात नंदुरबार पोलीसांनी बळ ओतले. एका दिव्यांगास नियतीने लाथाडले पण पोलीसांनी आपलेसे केले.मागेही एका गरीब वृद्धास मदतीचा हात देऊन नंदुरबार पोलींसानी समाजापुढे एक आदर्श घालून दिला होता.
पोलीस अधीक्षक कार्यालयातून घरी जाताना श्रेयसच्या डोळ्यात अश्रू होते.जाता जाता तो पोलिसांना आपल्या अडखळत्या शब्दात कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती नक्कीच म्हणाला असेल..
“मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा!
पाठीवरती हात ठेवून…
फक्त लढ म्हणा!!”

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादीतर्फे चुल पेटवा आंदोलन, इंधन दरवाढीविरोधात केंद्र शासनाचा निषेध

Next Post

तापमानाचा पारा वाढल्याने चोरट्यांचा चोरीचे ठिकाण बदलले, नंदूरबार येथे या ठिकाणी झाली चोरी

Next Post
तापमानाचा पारा वाढल्याने चोरट्यांचा चोरीचे ठिकाण बदलले, नंदूरबार येथे या ठिकाणी झाली चोरी

तापमानाचा पारा वाढल्याने चोरट्यांचा चोरीचे ठिकाण बदलले, नंदूरबार येथे या ठिकाणी झाली चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

20 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले, शाहाद्यात लाचलुचपत विभागाची धडाकेबाज कारवाई

April 30, 2026
राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

राज्य सेवा हक्क दिनानिमित्त नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा विशेष गौरव

April 30, 2026
पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

पनीरच्या नावाखाली चीज अ‍ॅनालॉग’चा वापर केल्यास कठोर कारवाई

April 30, 2026
‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर सतर्क; चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

April 30, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

1 मे रोजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन

April 30, 2026
मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add