नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार व शहाद्यातून मोटरसायकल लंपास झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान जिल्हाभरात काही दिवसांपासून मोटरसायकल लंपास केल्या जात असून याप्रकरणी पोलीस दलाने ठोस कारवाई करणे अपेक्षीत आहे. नंदुरबार शहरातील शिवाजीनगर येथे राहणार्या सुनिल भगवान पाटील यांची १२ हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.१९- डी.पी.४२५२) अज्ञात चोरटयांनी लंपास केली. याप्रकरणी सुनिल भगवान पाटील यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोना अमोल जाधव करीत आहेत. दरम्यान दुसर्या घटनेत शहादा शहरातील मुरलीमनोहर कॉलनीत राहणार्या सागर प्रकाश पाटील यांची ४० हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (क्र.एम.एच.३९-ए.ई.६०१४) अज्ञात चोरटयांनी लंपास केली. याप्रकरणी सागर प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात भादंवि कलम कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण पावरा करीत आहेत.