तळोदा l प्रतिनिधी
गुरुदेव श्री.श्री.रविशंकर यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून दत्तमंदिर येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले त्यात एकूण 66 दात्यांनी रक्तदान केले. शिबीराचे उदघाटन डाॅ. चेतन महाजन आयुर्वेदाचार्य पुणे यांचा हस्ते पार पडले.यावेळी डॉ चेतन महाजन यांनी रक्तदानाचे महत्व बद्दल माहिती दिली. रक्तसंकलन नवजीवन ब्लड बॅकेचे डाॅ. सुनिल चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आर्ट ऑफ लिव्हिग चे योग शिक्षक स्वप्निल राणे, योग शिक्षिका श्रीमती शोभना महाजन, योग शिक्षिका सौ सविता कलाल, जेष्ठ व्हॉलिंटीअर अजित टवाळे , नितीन मगरे, जगदिश शिरसाठ, उदय सुर्यवंशी, मुकुंद वाघ, संजय तांबोळी, शिरीष माळी, सौ नलीनी मगरे, मुरलीधर मगरे, प्रतिभा टवाळे, योगिता मगरे, संतोष पवार, नितीका पवार, शितल सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. रक्तदान शिबिरात एकुण 66 बाटल्या रक्त संकलन झाले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग चे युवाचार्य पुष्पर कर्णकार, प्रेमकुमार पवार, ॠषिकेश वाघ व मुकेश कलाल यांच्या सह सर्व आर्ट ऑफ लिव्हिग परीवार तळोदा यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन मुकेश कलाल यांनी केले.