नंदूरबार l प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील ऐचाळे येथील विवाहितेचा आज दुपारच्या सुमारास विजेचा जबर शॉक लागल्याने जागेवर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने ऐचाळेसह परिसर सुन्न झाला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ऐचाळे येथील विवाहिता सौ.स्वरा पंकज शेलार ही आपल्या आजी-आजोबांच्या गावी गेली असता तिचा आज विजेचा जबर शॉक लागून मृत्यू झाला. सदर विवाहितेला एक सहा ते सात महिन्यांची एक चिमुकली असून त्या चिमुकलीला या दुर्दैवी घटनेने पोरकी करून गेली आहे. यामुळे सारा परिसर व गावातील सर्व नागरिकांनी मध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे ऐचाळेच्या शेलार परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वराच्या पश्चात पती, एक लहानशी चिमुकली , सासु-सासरे असा परिवार आहे. स्वरा यांचे पती पंकज तुकाराम शेलार वैद्यकीय क्षेत्रात असून ते कामानिमित्त बाहेर गावी असुन ते रात्री उशिरापर्यंत ऐचाळे येथे पोहचणार असून स्वरा यांचा अंत्यविधी आज १६ मेच्या रात्री उशिरापर्यंत करण्यात येणार आहे.