अक्कलकुवा l प्रतिनिधी
प.पू. खरतरगच्छाधिपति आचार्य भगवंत श्री जिनमणिप्रभसूरीश्वरजी महाराजा की आज्ञानुवर्तिनी पार्श्व मणि तीर्थ प्रेरिका गच्छ गणिनी प.पू. साध्वी श्री सुलोचनाश्रीजी म.सा. यांचा सुशिष्या प.पू. साध्वी श्री प्रियसौम्यांजनाश्रीजी म.सा., आदि ठाणा 3 यांचा पावन निश्रेत अक्कलकुवा येथील श्रीमती पंखाबाई जसराजजी चोपडा आराधना भवन येथे त्रिदिवसीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाघाटन जैन मूर्तिपूजक संघाचे अध्यक्ष प्रेमचंद गुलेच्छा, राजेंद्र डागा, महेंद्र डागा, रतनलाल गुलेच्छा, अरविंद बोथरा, सुरेश गुलेच्छा, यांचा हस्ते भगवान महावीर स्वामी, श्री गौतम स्वामी, श्री जिनकुशलसूरि गुरुदेव, श्री सरस्वती माता, यांचा प्रतिमेला वंदन करून द्वीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी प्रथम दिवशी भ. महावीर की कॉलेज बेसिक नॉलेज या विषयवार प.पू. साध्वी श्री यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिरात 70 शिबिरार्थी यांनी सहभाग घेतला आहे. सदर यावेळी ॲड. गजेंद्र भंसाली, कीर्तिकुमार गुलेच्छा, कुशल गुलेच्छा आदि उपस्थित होते. सदर शिबिराचे समारोप कार्यक्रम 16 में रोजी होणार आहे. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुभम भंसाली यांनी केले.