म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा शिक्षक करणसिंग उखा चव्हाण यांचा राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्कार देऊन दिल्ली येथे सन्मान करण्यात आला.आतापर्यंत उत्कृष्ट खेळाडू, आदर्श पंच, आदर्श शिक्षक, कवी, विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य नप व मनपा शिक्षक संघाचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष करणसिंग चव्हाण यांचा नवी दिल्ली येथील (event conference hall) मध्ये पार पडलेल्या मनुष्यबळ विकास अकॅडमी द्वारा National Level Pratibha Samman Award Ceremony मध्ये डॉ. सानिपीना राव (इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन, visitor of NASA, USA) यांच्या शुभहस्ते राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच डॉ.स्मायली मुक्ता घोषाल (global brand ambassador ,USA) व पद्मश्री पुरस्कार प्राप्त विजयकुमार शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना भारतज्योति राष्ट्रीय क्रिडारत्न पुरस्कार देण्यात आला.
या अगोदर चव्हाण यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार ,जिल्हा क्रीडा पुरस्कार ,राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,नंदनगरी रोटरी क्लब गुरुजन पुरस्कार ,दै.स्वतंत्र भारत गुरुजन पुरस्कार, कोरोना योद्धा पुरस्कार ,राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार अश्या विविध पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत क्रीडा क्षेत्रात ते स्वतः खो खो चे उत्कृष्ट खेळाडू व राज्य पंच असून महाराष्ट्र राज्यभर पंचाची उत्कृष्टपणे कामगिरी करीत असूनआज पर्यंत अनेक उल्लेखनीय कामगिरी केलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातून खोखो असेल कबड्डी असेल किंवा इतर खेळातून अनेक विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय,विभागीय स्तरीय, राज्यस्तरीय , राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना नेण्याचे कार्य करण चव्हाण यांनी केलेले आहेत या सर्व कामगिरीचा आलेख पाहून मनुष्यबळ विकास यांच्याकडून दिल्ली राष्ट्रीय क्रिडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. या कामगिरीसाठी चव्हाण यांना मार्गदर्शन म्हणून प्राध्यापक राजेश सोनवणे, मनोज परदेशी,विद्या गौरव इंग्लिश मेडीयम स्कूल आमलाड चे क्रीडा शिक्षक पुलायन जाधव, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे.दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी, नंदुरबार नगर परिषदचे मुख्याधिकारी अमोल बागुल, नंदुरबार शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे व परिसरातून सर्व गुरुजन व समाज बांधव अभिनंदनाचा वर्षाव करून शुभेच्छा देत आहेत.