म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती च्या मुख्यकार्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक,नवजीवन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी यांची जिल्हा मुख्यालय आयुक्त (स्काऊट.) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार भारत स्काऊट्स आणि गाईड्स जिल्हा संस्थेची स्थापना 2 ऑक्टोबर 2007 पासून झाली जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शासकीय अनुदानित आश्रम शाळा जिल्हा परिषद व खाजगी तसेच नगरपरिषद प्राथमिक शाळांमध्ये कब-बुलबुल, स्काऊट-गाईड,रोव्हर-रेंजर पथक सक्रिय कार्यरत आहे नाशिक विभागामध्ये इतर जिल्ह्यांच्या तुलनेत नंदुरबार जिल्हा संस्थेची संख्यात्मक व गुणात्मक वाढ लक्षणीय आहे.जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये प्रत्येक शाळेतील स्काऊट आणि गाईड सहभागी होण्याकरिता जिल्हा कार्यालय सतत प्रयत्नशील आहे .महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड राज्य कार्यालय मुंबई संस्थेचे राज्य मुख्य आयुक्त तथा क्रीडा आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र शासन ओमप्रकाश बकोरिया (IAS) यांनी नंदुरबार भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा संस्थेवर आपल्या संस्थेचे मुख्य कार्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक ,नवजीवन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव पुष्पेंद्र रघुवंशी यांची जिल्हा मुख्यालय आयुक्त (स्काऊट.)या पदावर नियुक्ती करण्यात आली यासाठी आपल्या संस्थेचे चेअरमन ,माजी.आमदार चंद्रकांत रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी तथा संस्थेचे सचिव यशवंत पाटील आदीनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.