नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार ते शहादा रस्त्यावरील डामरखेडा बसस्थानकाजवळ एस.टी.बसने आयशर ट्रकला धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून याप्रकरणी एस.टी. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, बजरंगी बेबीप्रसाद तिवारी रा.जीआयडीसी, अहमदाबाद हे त्यांच्या आयशर ट्रक घेवून नंदुरबार ते शहादा रस्त्याने जात होते. यावेळी एका एस.टी. बस चालकाने त्याच्या ताब्यातील एस.टी. बस (क्र.एम.एच.४० एन ९०३३) भरधाव वेगात चालवून डामरखेडा बसस्थानकाजवळ आयशर ट्रकला मागून धडक दिल्याने आयशर ट्रकच्या मागील भागाचे नुकसान झाले. तसेच एस.टी. बसचा पुढील काच फुटला व बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाचा पुढील दात पडून दुखापत झाली. याबाबत बजरंगी तिवारी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात एस.टी. बस चालकाविरुद्ध भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रामा वळवी करीत आहेत.