नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील सोमावल बु. येथे घरात अनधिकृत प्रवेश करीत एकास मारहाण करीत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधिक्षक यांच्या सह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा तालुक्यातील सोमावल बु. येथील विठ्ठल सखाराम बागले यांच्या घरात पोलिस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा, नंदुरबार आत्माराम मगन प्रधान ,पृथ्वीराम मगन प्रधान व आदित्य आत्माराम प्रधान सर्व रा.सोमावल बु. ता.तळोदा यांनी अनधिकृत प्रवेश केला. तसेच विठ्ठल बागले यांना शिवीगाळ करीत मारहाण करुन जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत विठ्ठल बागले यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ४५२, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा करीत आहेत.