शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नरेंद्र बागले, कार्याध्यक्षपदी अंबालाल पटेल तर सचिवपदी कमलेश पटेल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी संलग्न, नंदुरबार जिल्हा मराठी पत्रकार संघाशी संलग्नित शहादा तालुका मराठी पत्रकार संघाची सभा येथील हॉटेल अतिथी च्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येऊन नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. यात
अध्यक्ष – नरेंद्र बागले, सचिव- कमलेश पटेल,कार्याध्यक्ष- अंबालाल पाटील ,
सहसचिव- गिरधर मोरे, उपाध्यक्ष- दिनेश पवार, किरण सोनार , रमेश पाटील, संजय पाटील. कोषाध्यक्ष- सलाउद्दीन लोहार ,
प्रवक्ता- मुकेश पटेल, समन्वयक- ईश्वर पाटील,
कार्यकारिणी सदस्य- धनराज गोसावी, प्रफुल सूर्यवंशी, भवरलाल जैन, प्रभाकर घोडराज, जगदीश अहिरे, पुरुषोत्तम आगळे , विनोद अहिरे, मनोज बिरारी, अनिल पवार, हितेंद्र चौधरी, पूनम चव्हाण. कायदेशीर सल्लागार- ॲड.राजेश कुलकर्णी, मार्गदर्शक- संजय राजपूत ,
सल्लागार- सुधाकर पाटील,पी.सी.पटेल, डॉक्टर सतीश चौधरी. आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावे यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत म्हणाले, पत्रकार हा समाजा पुढे आदर्श एक आदर्श असतो.समाज नवनिर्मितीचे काम तो करतो. त्यामुळे आदर्शवत काम करून संघ कुटुंबाप्रमाणे एकसंघ रहावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रत्येकाचा सुखदुःखात आवर्जून मदत करा पदाची लालसा ठेऊ नका. ग्रामीण व शहरी पत्रकार कार्यक्षेत्र वेगळे असले तरी आपण सर्व एकच आहोत याचे भान ठेवून सगळ्यांनी काम करावे. तसेच नूतन कार्यकारीने जबाबदारीने सगळ्यांना सोबत घेऊन काम करत असताना संघाच्या लौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी संघाचे सचिव नरेंद्र बागले यांनी गेल्या वर्षाचा उपक्रमांचा आढावा मांडला. सूत्रसंचालन पी.सी. पटेल यांनी तर आभार धनराज गोसावी यांनी मानले.