शहादा l प्रतिनिधी
गेल्या दहा वर्षात प्रत्येक क्षेत्रात स्थित्यंतरे झाली आहेत. सोशल मीडिया द्वारे माहिती वेगाने पसरत आहे. त्यात वृत्तपत्र क्षेत्रातूनही ब्रेकिंग न्यूज द्वारे माहिती पोचवली जाते. सर्वच क्षेत्रात महिला आहेत वृत्तपत्र क्षेत्रातही महिलांनी पुढे यावे.त्याच बरोबर वृत्तांकन करत असताना पत्रकारांनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी सजगता बाळगावी. पत्रकार हा समाज मनाचा भाव असतो आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी सर्वसामान्यांच्या व्यथा, प्रश्न मांडत असतात. पत्रकारांनी विधायक पत्रकारिता करावी असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांनी केले.
शहादा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार बांधवांनाअपघात विमा पॉलिसी व संघाचे ओळखपत्र वाटप तसेच पत्रकारिता सोबतच इतर सामाजिक कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तालुक्यातील पत्रकारांचा येथील हॉटेल अतिथी मध्ये सन्मान सोहळा संघातर्फे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉक्टर गिरासे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी,मुख्याधिकारी दिनेश सिनारे,शहादा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे, म्हसावद पोलिस ठाण्याचे निरीक्षक निवृत्ती पवार, सारंगखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भगवान कोळी, पत्रकार संघाचे जेष्ठ मार्गदर्शक संजय राजपूत, पत्रकार संघाचे सचिव नरेंद्र बागले आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलीस निरीक्षक विजय पवार म्हणाले की, काम करीत असताना चुका होतात काम करणारा चुका करतच असतो. प्रशासनाला चुका दर्शविण्याचे काम पत्रकारांना मार्फत होते. पत्रकारांनी दाखविलेले चूक व्यवस्थित समजली तर प्रशासन व्यवस्थित चालते. मोबाईलच्या युगात वृत्तपत्रांचे महत्त्व आजही कायम आहे.पत्रकारिता हा विषय चरितार्थासाठी नाही जो चरितार्थासाठी पाहतो तो हाडाचा पत्रकार होऊ शकत नाही. पत्रकारिता ही रक्तात असायला हवी नवोदित पत्रकारांनी ज्येष्ठांच्या आदर्श घ्यावा व सकारात्मक पत्रकारिता करावी. तहसीलदार डॉक्टर मिलिंद कुलकर्णी म्हणाले की, कोरोना काळात निवडणुकीच्या काळात पत्रकारांनी मोलाचे सहकार्य प्रशासनाला केले पत्रकारिता करत असताना सकारात्मक पत्रकारितेवर विशेष भर द्यावा तर पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार म्हणाले, सद्यस्थितीत व्हाट्सअप सोशल मीडियाचा युगात विश्वासार्हता कमी होत असली तरी वर्तमानपत्रांनी आपली विश्वासार्हता कायम ठेवली आहे आजही वर्तमानपत्रातील बातमीला विशेष महत्त्व असते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार संजय राजपूत यांनी केले सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्राध्यापक अनिल साळुंके यांनी केले.
सन्मानार्थी पत्रकार असे : सुधाकर पाटील, कमलेश पटेल, डॉक्टर सतीश चौधरी, हितेश पटेल, मुकेश पटेल, भवरलाल जैन ,रवींद्र चव्हाण, कल्पेश राजपूत तर विशेष सन्मान कोरोना योद्धा नरेंद्र बागले यांचा करण्यात आला.यावेळी तालुक्यातील पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.