नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील शिरुड दिगर येथे शेतीच्या वादातून पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील सावळदा येथील सुधीर गुंजाळ व संदिप कदम यांच्यात शेतीचा वाद होता. या वादातून संदिप कदम व त्याच्यासोबत असलेले दोन अनोळखी इसम रा.येवेले आखाडा राहुरी जि.अहमदनगर, मनिषा नितीन गुंजाळ, संगिता दिवाकर गुंजाळ, प्रेरणा नितीन गुंजाळ सर्व रा.शिरुड दिगर ता.शहादा यांनी सुधीर गुंजाळ व स्मिता सुधीर गुंजाळ यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याबाबत स्मिता गुंजाळ यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४६, १४७, ३५४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास माया राजपूत करीत आहेत.