नंदूरबार l प्रतिनिधी
स्वच्छ विद्यालय पुरस्कार मुल्यांकनासाठी विखरण येथील देवरे विद्यालयात कमिटीची प्रत्यक्ष कामांची पाहणी केली.
खोंडामळी येथील श्री.आप्पासाो आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण विद्यालयात “स्वच्छ विद्यालय पुरस्कार” मुल्यांकन संदर्भात कमिटीतील केंद्र प्रमुख श्रीमती रेखा बंडू पानपाटील,तंत्रस्नेही शिक्षक किरण रामदास देसले,, तंत्रस्नेही शिक्षक सुरेश बाबुलाल भोई, अशोक गिरीधर नगराळे, केंद्र प्रमुख यांनी भेट देऊन विविध बाबींची पाहणी करून मुल्यांकन केले.’स्वच्छ विद्यालय पुरस्कार’ अंतर्गत निकषांवर ज्यात विद्यालयातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, हॅन्डवाॅश स्टेशन,शालेय परिसरातील स्वच्छता, इमारत,वर्ग खोल्या, मुला-मुलींचे स्वच्छतागृहे, कचरा व्यवस्थापन, आरोग्य व कोरोना संदर्भातील पूर्वतयारी, परसबाग तसेच स्वच्छता विषयावरील उपक्रम, नोंदी इ.तत्सम कामाबद्दल कमिटीतील सदस्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके,उपशिक्षक के.पी.देवरे, डी.बी.भारती, एम.डी.नेरकर,वाय.डी.बागुल, शिक्षकेतर आर.एम.पाटील,एस.जी.पाटील, श्रीम.एम. आर.भामरे उपस्थित होते.