म्हसावद l प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी पक्ष शहादा तालुका कार्यकारिणीच्या वतीने पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहादा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन दरम्यान करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमात पक्षाच्या वतीने अरूण रामराजे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष, डी. बी पाटील नंदुरबार जिल्हा अध्यक्ष, ब्रिजलाल दंगल शिरसाठ सामाजिक कार्यकर्ते, व ऐ .पी.आय.मोरे ऐ.पी.आय. संदिप आरक शहादा पोलीस ठाणे हे मान्यवर हजर होते ,सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले रक्तदान शिबिरात 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून नंदुरबार सिव्हिल हाँस्पिटल येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी रक्ताचे संकलन केले.
वंचित बहुजन आघाडी पक्षाचे यादव कुवर , नरेंद्र महिरे, राजेंद्र बिरारे, रामचंद्र महिरे, गणेश पेंढारकर,अर्जुन पानपाटील, राहुल कुवर ,रवि मोरे, आबा निकूंभे,भगवान रामराजे, विशाल महिरे, कैलास महिरे (कँप्टन),भाउराव पानपाटील असे पदाधिकारी उपस्थित होते तसेच शशिकांत पाटील, राकेश पाटील, रवी पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मेहनत घेतली असून कार्यक्रमाचे सुत्र संचालन बी. एस. बागुल (सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक) यांनी केले व तालुका अध्यक्ष गजेंद्र निकम यांनी सर्व कार्यक्रमातील मान्यवरांचे आदरातिथ्य नियोजन केले.सदर कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.