खापर l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वेली येथील अक्कलकुवा पं.स.माजी सदस्य वाण्या दौल्या वळवी यांची जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती नुकतीच गठीत करण्यात आली असुन जिल्हाधिकारी हे हया समितीचे अध्यक्ष आहेत तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ,पोलीस अधिक्षक, पोलीस अधिक्षक लाचलुचपत विभाग,अधिक्षक अभियंता हे भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे शासकीय सदस्य आहेत.या समितीवर अक्कलकुवा तालुक्यातील वेली येथील रहिवासी व माजी अक्कलकुवा पं.स.माजी सदस्य वाण्या दौल्या वळवी यांची अशासकीय सदस्य म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी वाण्या वळवी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.सदर समितीवर वाण्या वळवी यांच्या व्यतिरिक्त इतर तालुक्यातुन 5 सदस्य अशासकीय सदस्य म्हणुन नियुक्त करण्यात आले आहेत.