Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोपर्ली येथे ज्वेलर्सचे दुकान फोडुन चोरट्यांनी ३० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

team by team
May 10, 2022
in क्राईम
0
कोपर्ली येथे ज्वेलर्सचे दुकान फोडुन चोरट्यांनी ३० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली गावातील साईदर्शन ज्वेलर्स दुकान फोडुन चोरट्यांनी ३० हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली गावात असलेले साईदर्शन ज्वेलर्स दुकान व त्या शेजारी असलेल्या मेडीकल दुकान चोरट्यांनी फोडले . साई ज्वेलर्सचे व मेडीकलचे शटर उचकवुन चोरट्यांनी आत प्रवेश केला . ज्वेलर्स दुकानातुन २४ हजार ६५० रु . किंमतीचा तीन ग्राम वजनाचा मोती व अमेरीकन डायमंड असलेल्या चांदीच्या एकुण १७० अंगठ्या तसेच मेडीकल दुकानाच्या गल्ल्यातुन रोख ५४०० रुपये असा एकुण ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आला . चोरीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे , नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक राहुलकुमार पवार आपल्या पथकासह कोपर्ली गावी पोहचले . त्यांनी चोरी झालेल्या दुकानांची पहाणी केली . श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले होते , याबाबत रुपेश सुमनलाल सोनार यांच्या फिर्यादीवरुन अज्ञाताविरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ४५७ , ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोकॉ सुनिल अहिरे करित आहे .

बातमी शेअर करा
Previous Post

दोघा मित्रांना मारहाण करुन रोकडसह मोबाईल लांबविला, चौघांविरुध्द गुन्हा दाखल

Next Post

अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला

Next Post
अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला

अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add