Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला

team by team
May 10, 2022
in राज्य
0
अन्न कचऱ्यापासून निर्मित वीजेवर इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करण्याचा देशातील पहिला मान मुंबईला

मुंबई l
मुंबई महानगराच्या पर्यावरण संवर्धनासाठी आणि ‘स्वच्छ – सुंदर मुंबई’ साठी एका पाठोपाठ उपक्रम सुरु करताना बृहन्मुंबई महानगरपालिकेने आज आणखी एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. ‘डी’ विभागातील केशवराव खाड्ये मार्गावर अन्न कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाला इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशनची जोड देण्यात आली आहे. अशा स्वरुपाचे भारतातील हे पहिलेच चार्जिंग स्टेशन असून त्याचे लोकार्पण राज्याचे पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, फूड वेस्टमधून निर्मित वीजेचा उपयोग करुन इलेक्ट्रिक व्हेईकल चार्ज करणारे भारतातील हे पहिलेच केंद्र आहे. अशा स्वरुपाचे केंद्र मुंबईतच नव्हे तर राज्यातील शक्य त्या ठिकाणी उभारण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विशेषतः महामार्गांवर त्याचा प्राधान्याने विचार केला जाईल. त्यातून विद्युत वाहनांच्या वापराला चालना तर मिळेलच, सोबत सेंद्रिय, जैविक स्वरुपाच्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन देखील होईल, असे त्यांनी नमूद केले.
महानगरपालिकेचा ‘डी’ विभाग आणि एरोकेअर क्लीन एनर्जी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प साकारला आहे. हाजी अली परिसरात केशवराव खाड्ये मार्गावर माँसाहेब स्व. सौ. मीनाताई ठाकरे उद्यानाजवळ महानगरपालिकेने टाकावू अन्नापासून (फूड वेस्ट) वीजनिर्मिती प्रकल्प उभा केला आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ पर्यावरणमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सप्टेंबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे दीड लाख किलोपेक्षा अधिक टाकाऊ अन्नपदार्थांवर प्रक्रिया करुन वीजनिर्मिती करण्यात आली आहे.
या प्रकल्पातून तयार होणारी वीज आता विद्युतभारित वाहनांसाठी अर्थात इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी उपयोगात येणार आहे. या वीजनिर्मिती प्रकल्पाला जोडून इलेक्ट्रिक व्हेईकल फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण देखील पर्यावरणमंत्री श्री. ठाकरे यांनी केले. या ठिकाणी चार्जिंगसाठी दोन पॉईंट आहेत, म्हणजेच एकावेळी दोन वाहने आणि तेही जलद गतीने चार्ज होऊ शकतात. माफक दरात ही चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल.
या लोकार्पणप्रसंगी उप आयुक्त (पर्यावरण) सुनील गोडसे, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड, एरोकेअर क्लीन एनर्जीचे संस्थापक अंकित झवेरी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

कोपर्ली येथे ज्वेलर्सचे दुकान फोडुन चोरट्यांनी ३० हजाराचा मुद्देमाल केला लंपास

Next Post

खरीप हंगामासाठी महसूल विभाग सज्ज; शेतकऱ्यांना वेळेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार बियाणे व खते : कृषीमंत्री दादाजी भुसे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add