नंदुरबार l प्रतिनिधी
वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त उमर्दे खुर्दे ता.नंदूरबार येथे फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
नंदूरबार तालुक्यातील उमर्दे खुर्दे येथील श्री महाराणा प्रताप चौकात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते फलकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी सरपंच अरविंद ठाकरे, उपसरपंच सागर साळुंखे, ब्रिजलाल बोराणे, कृष्णा कदमबांडे, नरेश कदमबांडे, रामसिंग गिरासे, देवेंद्र राजपूत, जितेंद्र कदमबांडे, किशोर गिरासे, राम राजपूत यासह श्री.महाराणा प्रतापसिंह मित्र मंडळाचे सदस्य, समाज बांधव उपस्थित होते.