म्हसावद l प्रतिनिधी
क्रीडा क्षेत्रात व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल करणसिंग चव्हाण यांना दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.
या अगोदर करणसिंग चव्हाण यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहेत आदर्श शिक्षक पुरस्कार ,जिल्हा क्रीडा पुरस्कार ,राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,नंदनगरी रोटरी क्लब गुरुजन पुरस्कार ,स्वतंत्र भारत गुरुजन पुरस्कार, राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार अश्या विविध पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत क्रीडा क्षेत्रात ते स्वतः खो खो चे उत्कृष्ट खेळाडू व राज्य पंच असून महाराष्ट्र राज्यभर पंचाची उत्कृष्टपणे कामगिरी करीत असूनआज पर्यंत अनेक उल्लेखनीय कामगिरी केलेले आहेत नंदुरबार जिल्ह्यातून खोखो असेल कबड्डी असेल किंवा इतर खेळातून अनेक विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय ,जिल्हास्तरीय,विभागीय स्तरीय, राज्यस्तरीय , राष्ट्रीय स्तरापर्यंत विद्यार्थ्यांना नेण्याचे कार्य करण चव्हाण केलेले आहेत.या सर्व कामगिरीचा आलेख पाहून मनुष्यबळ विकास यांच्याकडून दिल्ली येथे दि. 10 मे रोजी राष्ट्रीय क्रिडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या कामगिरीसाठी श्री. चव्हाण यांना मार्गदर्शन म्हणून प्राध्यापक राजेश सोनवणे, पुलायन जाधव, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व क्रीडा शिक्षक यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. दिल्ली येथे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी नंदुरबार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी, नंदुरबार नगर परिषदचे मुख्याधिकारी अमोल बागुल, नंदुरबार शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे व परिसरातून सर्व गुरुजन व समाज बांधव अभिनंदनाचा वर्षाव करीत आहेत.