नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील कोपर्ली येथील विवाहितेने बुलेट घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यासाठी छळ केल्याप्रकरणी सासरच्या तिघांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथील ममता यांचा विवाह मंगेश अरविंद कालेकर याच्याशी झाला होता. मात्र विवाहांतंतर बुलेट घेण्यासाठी माहेरहून ५० हजार रुपये आणावेत यासाठी मंगेश अरविंद कालेकर, वसुंधरा अरविंद कालेकर, प्रमोद मनोहर बनसोडे सर्व रा.चाकण ता.खेड जि.पुणे यांनी छळ केला. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेवून पाच वर्षाचा मुलगा अन्वेष याला हिसकावून घेत शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत ममता कालेकर यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात सासरच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.सुनिल अहिरे करीत आहेत.