नंदुरबार l प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय कराटे स्पर्धा जळगाव जिल्ह्यात संपन्न झाली. या स्पर्धेत जवळजवळ २५० ते ३०० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला कराटे स्पर्धा ८ ते २० जूनियर सब जूनियर सीनियर या वयोगटात घेण्यात आली. यावेळी स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ नंदुरबार डिस्ट्रिकच्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले.यात मुलांमध्ये ११वर्ष वयोगटात तक्ष लोढा सुवर्णपदक,९ वर्ष वयोगटात अर्णव महाले,मोक्ष वाघ, अथर्व विसपुते यांना रौप्यपदक,प्रणव चव्हाण कास्य पदक,१९ वर्षे वयोगटात हर्षवर्धन वळवीस रौप्यपदक तर मुलींमध्ये जूनियर आणि सीनियर गटात ९ वर्ष वयोगटात धु्विता सोनार हीला कास्यपदक, राजनंदनी पाटील रौप्यपदक, १० वर्ष वयोगटात साक्षी चव्हाण रौप्यपदक, ११ वर्ष वयोगटात रुचिता पाटील कास्यपदक, १२ वर्ष वयोगटात सिद्धी पटेल रौप्यपदक, १३ वर्ष वयोगटात वेदश्री सोनार कास्यपदक, १४ वर्ष वयोगटात दीक्षा पवार कास्यपदक, जान्हवी कासार रौप्य पदक आणि १८ वर्ष वयोगटात चंदना लोढा कास्य पदक या यशस्वी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय नाशिकच्या विभागीय उपसंचालक सुनंदा पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र व मेडल देण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स कराटे नंदुरबार जिल्ह्याचे सचिव व कराटे प्रशिक्षक डॉ.दिनेश बैसाणे यांचे मार्गदर्शन लाभले.