नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील मन्यार मोहल्ल्यात मुशायरा कवि संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करुन लोकांना जमवून व रात्री 11.30 पर्यंत कार्यक्रम घेवून मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील मन्यार मोहल्ल्यातील चौकात हारुन अब्दुल रशीद हलवाई याने मुशायरा कवि संमेलन व सिलसिलाए कार्यक्रमाचे आयोजन केले. रात्री १० वाजेपर्यंत परवानी दिलेली असतांनाही १५० ते २०० लोकांना जमवून रात्री 11.30 पर्यंत कार्यक्रम घेवून पोलिसांनी दिलेल्या परवानगीचे तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत पोना. नरेंद्र देविदास देवराज यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिसा ठाण्यात हारुन अब्दुल रशीद हलवाई याच्याविरुद्ध भादंवि कलम १८८ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सादिक शेख करीत आहेत.