Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथील यात्रोत्सवात मोठी उलाढाल, बैल खरेदी विक्रीतुन ८० लाखाची उलाढाल

team by team
May 6, 2022
in कृषी
0
तळोदा येथील कालिका माता यात्रेत पहिल्या दिवशी बैल खरेदी विक्रीतुन 65 लाखांची उलाढाल

तळोदा l प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने गेल्या दोन वर्षांपासून तळोदा येथील कालिकामतेची यात्रा भरली नव्हती त्यामुळे व्यावसायिक यांच्याबरोबर नगरपालिका तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती तळोदा येथील मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम झाला होता.त्यामुळे या वर्षी प्रशासन तसेच नगरपालिकेच्यावतीने यात्रा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्याप्रमाणे सारंगखेडा येथील यात्रा ही घोडेबाजारासाठी प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे तळोदा येथील कालिका माता यात्रा खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध आहे.या ठिकाणी मध्यप्रदेश,गुजरात,तसेच परीसरातील व्यापारी मोठ्या संख्येने बैल घेऊन येत असतात.त्याचप्रमाणे ग्राहक ही मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने बैल बाजारात मोठा उत्साह या ठिकाणी असतो बैलांबरोबरच त्यांच्यासाठी लागणाऱ्या साहित्याची सुद्धा या ठिकाणी विक्री करण्यात येत असते.
आज यात्रेचा ३ रा दिवस असून यात्रेत सुमारे ८६७ बैल खरेदी विक्री तुन सुमारे ८० लाखाची उलाढाल झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे सचिव सुभाष मराठे ,सहाय्यक सचिव हेमंत चौधरी तसेच कनिष्ठ लिपिक जयेश सूर्यवंशी यांनी दिली.
तळोदा शहरातील ग्राम दैवत देवी कालिंका माता यात्रा अक्षय्य तृतीये पासून भरत असते बैल बाजारासाठी खान्देशात प्रसिद्ध आहे सुमारे २१०० च्या आसपास बैल विक्रीसाठी दाखल झाले आहेत पहिल्या दिवशी सुमारे ६०० बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारात सुमारे ६५ लाखाची उलाढाल झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे पाणी विद्युत रोषणाई सुविधा पुरविण्यात अली आहे यावर्षी पहिल्या दिवशी उलाढालीत निरुत्साह दिसला आहे. विविध बैल व कृषी पूरक खरेदी विक्रीची दुकानही थाटली आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

५ वर्षीय बालिकेवरील अत्याचार करणार्‍या आरोपीस सत्र न्यायालयाने ठोठावला ७ वर्ष सश्रम कारावास

Next Post

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कुहाडीने केला खून

Next Post
लग्नाच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने तरुणाचा खून, चौघांना अटक

चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा कुहाडीने केला खून

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add