नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा फ्लोअरबॉल संघटनेच्यावतीने राष्ट्रीय फ्लोअरबॉल दिनानिमित्त जिल्हास्तरीय फ्लोअरबॉल स्पर्धचे आयोजन येथील श्रॉफ हायस्कूलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदविला तसेच यावेळी ग्वाल्हेर येथे पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.
यावेळी क्रीडा संघटक प्रा.डॉ. मयूर ठाकरे, टेनिस क्रिकेट स्पर्धेचे सचिव जगदीश वंजारी, शिवाजी माळी, जिल्हा रोलबॉल संघटनेचे सचिव नंदु पाटील, जिल्हा फ्लोअरबॉल संघटनेचे सचिव जितेंद्र माळी, क्रीडा संघटक आनंदा मराठे, विद्यापीठ खेळाडू माधवी ठाकरे आदी उपस्थित होते. संघटनेचे सचिव जितेंद्र माळी यांनी फ्लोअरबॉल खेळाचे जागतीक महत्त्व सांगत फ्लोअरबॉल खेळ निरोगी व सुदृढ आरोग्य देण्यासाठी दररोज खेळणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेत पंच म्हणुन भरत चौधरी व विशाल गावीत यांनी काम पाहिले.