नंदुरबार l प्रतिनिधी
येथील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे तथा भगवान रेस्टॉरंटचे मालक कै. दगडूशेठ जाधव यांचा ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारातर्फे वाढत्या तापमानात नागरिकांना गारवा देण्यासाठी थंडगार ताकचे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील प्रतिष्ठित कै. दगडूशेठ जाधव यांचा ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त जाधव परिवारातर्फे येथील सुभाष चौक परिसरात ताक वाटप करण्यात आले. सुमारे ३०१ लिटर चे वाटप करण्यात आले.
यावेळी बळवंत जाधव, ज्योती जाधव, राजश्री जाधव, मनोज जाधव,किसन जाधव, श्याम मराठे, माणिक माळी ,गजेंद्र शिंपी, योगेश जाधव, अशोक चौधरी, दिनेश अग्रवाल, भगवान चौधरी, मुख्याध्यापक महेंद्र फटकाळ, अभिजीत जाधव यांच्यासह परिसरातील व्यावसायिक व नागरिक उपस्थित होते.