नंदुरबार l प्रतिनिधी
‘हमे गीता से हमदर्दी, कुराण भी प्यारा है’, ‘हम तुटे तो तुटेगा भारत, एकता ही हमारा धर्म है’,’ हमे मिलजुल कर रहना है सियासत जिंदगी भर करना है अशा एक ना एक राष्ट्रीय एकात्मता व हिंदू-मुस्लीम भाईचाऱ्याच्या संदेश देत धर्मावरून राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या शहरात आयोजित कविसंमेलनातून चांगलाच समाचार घेण्यात आला.
सध्या राज्यभर भोंग्यांवरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे चित्र आहे. हिंदू-मुस्लीम बांधवांमध्ये एकजूट व्हावी म्हणून ईदच्या निमित्ताने नगरपालिकेचे माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक परवेज खान यांनी ईद मिलन व कौमी एकतेसाठी मन्यार चौकात मुशायरा व कवी संमेलनाचे आयोजन केले होते. संमेलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेसह हिंदू-मुस्लीम भाईचाराच्या संदेश देण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व विशेष अतिथी म्हणून मालेगाव येथील जमीन साहिर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून मुशायरा व कवी संमेलनाला सुरुवात झाली. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम राजकीय नेत्यांकडून सुरु आहे.धर्माच्या नावावर राजकारण करण्यात येत आहे.
गुण्यागोविंदाने राहणाऱ्या हिंदू-मुस्लीम बांधवांचा एकतेला बाधा काही राजकीय लोकप्रतिनिधी करीत आहेत त्यांच्यावर कवितेच्या माध्यमातून प्रहार करण्यात आला. कार्यक्रमास जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे,शहाद्याचे ज्येष्ठ नेते जहिर कुरेशी,पोलीस निरीक्षक किरण खेडकर,तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार, शहर वाहतूक शाखेचे सुनील नंद्वाळकर, माजी नगरसेवक राजू इनामदार,कुरेशी समाज अध्यक्ष लियाकत कुरेशी जका हुल्ला अहसनुल्लाह इमानदार, मौलाना हाफीज अब्दुल्लाह, मौलाना जकरीया रहेमानी,मौलाना मुश्फीक आलम, जकाउल्लाह हसनउल्लाह इनामदार, शिवसेना महानगरप्रमुख विजय माळी, माजी नगरसेवक मोहन माळी, निंबा माळी, मो.अमिन मो.उमर अन्सारी, सैय्यद अबुल हसनात पिरजादे,मो.हनिफ मो.उमर शेख, नजमोद्दीन फयाजोद्दीन शेख, लियाकत अली गुलाम शब्बीर, साबीक, अ. बारी अ. समद मन्यार, शेख बशीर शेख कादर, सदस्य संगी मियां ट्रस्ट, हारुन हलवाई आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन नगरसेवक परवेज खान यांनी केले.