नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील राणीपूर गावात लग्नात नाचतांना धक्का लागल्याच्या कारणावरुन एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील राणीपूर येथील किरण युवराज पावरा यांचा लग्नात नाचतांना पहाडसिंग भिल याला धक्का लागला. या कारणावरुन किरण पावरा यांना पहाडसिंग भिल, गुरुदेव भिल, राहूल भिल यांनी काठीने मारहाण करुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत आकेश युवराज पावरा यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.मोहन साळवे करीत आहेत.