तळोदा l प्रतिनिधी
येथील कालिका माता यात्रा खान्देशात बैल बाजारासाठी प्रसिद्ध असून काल सुमारे 600 बैल खरेदी विक्री तुन सुमारे 65 लाखाची उलाढाल झाल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे देण्यात आली आहे.
तळोदा शहरातील ग्राम दैवत देवी कालिंका माता यात्रा अक्षय्य तृतीये पासून भरत असते बैल बाजारासाठी खान्देशात प्रसिद्ध आहे सुमारे 1800 बैल विक्रीसाठी दाखल झाले आहे.काल पहिल्या दिवशी सुमारे 600 बैल खरेदी विक्रीच्या व्यवहारात सुमारे 65 लाखाची उलाढाल झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तर्फे पाणी विद्युत रोषणाई सुविधा पुरविण्यात अली आहे यावर्षी पहिल्या दिवशी उलाढालीत निरुत्साह दिसला आहे. विविध बैल व कृषी पूरक खरेदी विक्रीची दुकानही थाटली आहेत.