Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अखेर नंदुरबार शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवर म्हटली हनुमान चालीसा

team by team
May 4, 2022
in राज्य
0
अखेर नंदुरबार शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी लाऊडस्पीकरवर म्हटली हनुमान चालीसा

नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार नंदुरबार शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हनुमान मंदिर हनुमान चालीसाचे वाचन केले. धुळे रस्त्यावरील हिंदू एकता मित्र मंडळाच्या हनुमान मंदिरात लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा म्हणण्यात आली. यावेळी परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्याचा अल्टिमेटम दिला होता. हे भोंगे उतरवले गेले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी ४ मे रोजी राज्यभर मशिदींपासून हनुमान मंदिरांमध्ये दुप्पट आवाजाने भोंगे लावून हनुमान चालीसा म्हणावी, असा आदेश मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नंदुरबार शहरातील धुळे रस्त्यावरील हिंदू एकता मित्र मंडळाच्या हनुमान मंदिरात सकाळी ११ वाजता एकत्र येऊन मनसेच्या कार्यकर्त्यांनी लाऊडस्पीकर लावत हनुमान चालीसा म्हटली. याप्रसंगी मनसेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय विश्वनाथ चौधरी, नंदुरबार तालुकाध्यक्ष राकेश माळी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण जोशी, जिल्हा सचिव पवनकुमार गवळे, उपशहराध्यक्ष राम ठक्कर, बबन पाडवी, अनिल पेंढारकर, अशोक माळी, उमेश मदने यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा म्हणण्यात आली आहे. तसेच यापुढेही राजसाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल. या मोहिमेत मनसेच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदूरबार जिल्ह्यातील प्रत्येक मज्जित बाहेर बंदोबस्त,पोलीसांनी 17 मनसे कार्यकर्त्यांना बजावल्या नोटीसी

Next Post

नंदुरबार शहरात राजकीय हस्तक्षेप थांबवून प्रस्तावित विकासाकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, भाजपा नगरसेवकांचे पालिका मुख्याधिकाऱ्याना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026
धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

धावडीपाडा ते भादल रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 4, 2026
खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद दौरा 5 जूनला जिल्ह्यात; तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक

June 4, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

पालकमंत्री हसन मुश्रीफ आज जिल्हा दौऱ्यावर; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट

June 4, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add