नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील मांजरा ते सुरवाणी शिवारातील वळण रस्त्यावर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघांना दुखापत झाली असून याप्रकरणी वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील जुगणी पाटीलपाडा येथील विरसिंग ओजमा पवार हे दुचाकीवर (क्र.एम.एच.३९ एएच ६३८०) अलकाबाई विरसिंग पवार यांना बसवून मोजरा ते सुरवाणी रस्त्याने जात होते. यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनावरील चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.३९ एबी ८०८७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन मोजरा गावाच्या शिवारातील वळणावरील रस्त्यावर भरधाव वेगात चालवून समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात विरसिंग पवार व अलकाबाई पवार या दोघांना दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरुन पसार झाला. याबाबत विरसिंग पवार यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात वाहन चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.दीपक वारुळे करीत आहेत.










