नवापूर l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन
समितीच्या अशासकिय सदस्यपदी नगर पालिकेचे विरोधीपक्ष गटनेते तथा नगरसेवक नरेंद्र नगराळे यांची निवड करण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली भ्रष्टाचार निर्मुलन समितीत नरेंद्र नगराळे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, विभागीय मृदू संधारण अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्यासह नंदुरबार येथील देवमन पवार यांचा समितीत
समावेश करण्यात आला आहे. नरेंद्र नगराळे यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










