Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते ३० महिला बचत गटानां 35 लाखांचे कर्ज मंजुरीचे पत्र वाटप, 660 जणांचा काढला विमा

team by team
April 30, 2022
in राजकीय
0
खा. डॉ. हिना गावित यांच्या हस्ते ३० महिला बचत गटानां 35 लाखांचे कर्ज मंजुरीचे पत्र वाटप, 660 जणांचा काढला विमा

नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाच्या योजना तळागाळातील लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातल्या दुर्गम भागात असलेल्या वाडीबार गावात बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे   “महा जन समृद्धी” मोहिमे अंतर्गत आर्थिक समावेशन व साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. डॉ. हिना गावित होत्या. त्यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचे उप महाव्यवस्थापक राजेश देशमुख, बँक ऑफ महाराष्ट्र, जळगाव झोनच्या झोनल मॅनेजर रशमीरेखा पती, डेप्युटी झोनल मॅनेजर संदीप पोटे आदी उपस्थित होते..
पायाभूत सुविधा, शिक्षण, कृषी आणि जलसंधारण, कौशल्य विकास, आरोग्य, आर्थिक समावेशन आदी क्षेत्र निकषांवर ‘महत्त्वाकांक्षी जिल्हे’ म्हणून देशातील १०१ जिल्ह्यांची निवड निती आयोगाने जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश आहे. आर्थिक समावेशन वाढविण्याकरिता तसेंच २०२५  पर्यंत  राज्य आणि राष्ट्रीय  मुख्य कार्यप्रदर्शन निर्देशक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ तर्फे नंदुरबार जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करून, या अंतर्गत जण धन योजने अंतर्गत बँक खाते सुरु करणे, पात्र खातेधारकांना प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ मिळवून देणे,  प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना अंतर्गत विमा उतरविणे. तसेच महिला बचत गट समूह यांना कर्ज वितरण करणे व जनतेला मोहोमेची माहिती देऊन त्यांची आर्थिक साक्षरता वाढविण्याच्या दृष्टीने ह्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात सुमारे ३० महिला बचत गटानां ३४ लाख ७० हजार रुपयांचे कर्ज मंजुरीचे पत्र, मुद्रा योजना कर्ज  मंजुरी पत्र, किसान क्रेडीट कार्ड, बँक खाते पासबुक यांसह विविध लाभाच्या प्रमाणपत्रांचे मान्यवरांचे हस्ते लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेत.
संपूर्ण आदिवासी वस्तीचे सुमारे ८१८ लोकसंख्या असलेल्या वाडीबार गावचे मोहीम स्तरावर आर्थिक समावेशन करण्यात आले आहे. या गावात पात्र २३० गावकऱ्यांचा प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजना व ४३० गावकऱ्यांचे प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजने अंतर्गत विमा उतरविण्यात आला आहे. संपूर्ण गाव जनधन खातेधारक झाले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र  मागील काही दिवसांपासून  मोहीम स्तरावर काम करत आहे. बँक प्रतिनिधी, अधिकारी व कर्मचारी यांनी वाडीबर गावातील प्रत्येक पाड्यावर/ घरोघरी  जाऊन वरील काम पूर्ण केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख संतोष पाटील यांचा सेवापूर्ती सोहळा

Next Post

महावितरणाच्या सबस्टेशनमधील ट्रान्स्फार्मर केबलला लागली अचानक आग

Next Post
महावितरणाच्या सबस्टेशनमधील ट्रान्स्फार्मर केबलला लागली अचानक आग

महावितरणाच्या सबस्टेशनमधील ट्रान्स्फार्मर केबलला लागली अचानक आग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नंदुरबारच्या नगरसेवकांनी मांडले शहरातील विविध प्रश्न

April 28, 2026
आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

आ.चंद्रकांत रघुवंशींनी घेतली दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट

April 28, 2026
अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

अक्कलकुवा येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे वेधले लक्ष

April 28, 2026
शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

शिरपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ.हिना गावित यांच्याशी साधला संवाद

April 28, 2026
गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

गौसन्मान रॅलीत गौमाता व नंदीबाबाने वेधले लक्ष

April 28, 2026
डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

डॉ. हिना गावित आणि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिषदेच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन

April 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add