नवापूर | प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील बंधारपाडा येथे ४५ हजाराचे अवैध सागवानी लाकूड वनविभागाने जप्त केले आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार यांनी पथकासह बंधारपाडा येथील रविदास श्यामा गावीत याच्या घराची झडती घेतली असता तेथे १ मोटरसह डिझाईन मशीन , १ इलेक्ट्रिक मोटर व ७१ साग नग कट साइज व फिनिश टिंबर माल अंदाजे ०.७५० घ . मी.साग माल मिळून आला . सदर मालाची बाजारभावानुसार अंदाजीत किंमत ४५ हजार रुपये आहे . सदर कार्यवाही वनक्षेत्रपाल नवापूर आर.बी.पवार , वनरक्षक सतीश पदमोर , कमलेश वसावे , तुषार नांद्रे , रामदास पावरा , दीपा कापडणे , संजय बडगुजर , वाहन चालक चामान्य , वनमजूर सतीश गावीत व भदाणे यांनी केली . सदर कार्यवाही मुख्य वनसंरक्षक दि.वा.पगार , उपवनसंरक्षक नंदुरबार के.बी. भवर , उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर १ ९ २६ वर संपर्क करावा असे अवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे .