म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेडा त त येथे नुकताच किसान भागीदारी प्राथमिक हमारी या अंतर्गत पिक विमा पाठशाळा आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची प्रस्तावना संतोष वळवी कृषी सहाय्यक यांनी केले. दत्तराज रावताळे तालुका पिक विमा प्रतिनिधी यांनी हंगामनिहाय कोणकोणत्या पिकांचा पिक विमा मध्ये समावेश होतो याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच कृषी सहाय्यक संतोष वळवी यांनी किसान क्रेडिट कार्ड विषयी उपस्थित असलेले शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी विभागाच्या मग्रारोहयो अंतर्गत योजना फळबाग लागवड, नॅडप, व्हर्मी, कंपार्टमेंट बर्डिंग, या कामांचा समावेश केला जातो.महाडीबीटी अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना इत्यादी योजनांची माहिती देण्यात आली व शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच उखा मोतीराम भील, शेतकरी निंबा चौधरी, शिवदास चौधरी, प्रकाश चौधरी, सखाराम चौधरी, मंगा चौधरी, सोमनाथ कारभारी, संगणक ऑपरेटर कैलास गवळे, पाणीपुरवठा शिपाई पीरण माळचे, राजेंद्र गवळे, सिद्धार्थ कापुरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .