नंदुरबार l प्रतिनिधी
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रजाळे ता.नंदुरबार येथील ८ पात्र लाभार्थ्यांना प्रशासकीय मान्यतेचे आदेश शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते देण्यात आले.
नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना राबविण्यात येत आहेत. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहिरीसाठी ग्रामस्थांनी प्रस्ताव सादर केले होते. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मान्यताप्राप्त आदेशांचे वाटप मंगळवारी शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले.
रजाळे ता.नंदुरबार येथील मधुकर धुडा पाटील,सुनील पंडित पांगारे, रंजना गुलाब पाटील,इंदुबाई शंकर पांगारे,हिराबाई संतोष पाटील, लोटन केशव मराठे,बन्सीलाल लक्ष्मण मराठे सुमनबाई लाला पाटील या ८ पात्र लाभार्थ्यांच्या समावेश असून, प्रत्येकी ३ लाख प्रमाणे ८ लाभार्थ्यांना २४ लाखाच्या सिंचन विहिरींच्या लाभ होणार आहे. याप्रसंगी उद्योजक मनोज रघुवंशी,जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी,पं.स उपसभापती कमलेश महाले,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किशोर पाटील,जि.प सदस्य प्रतिनिधी सुरेश शिंत्रे, नंदुरबार तालुका विधायक समितीचे सरचिटणीस यशवंत पाटील,रजाळ्याचे सरपंच शंकर पाटील,प्रा.बी.ए पाटील आदी उपस्थित होते.