म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मलोणी येथिल एस.ए.मिशन खाजगी प्राथमिक शाळेत राष्ट्रीय जंतनाशक दिवस निमित्ताने विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
मुख्याध्यापक प्रल्हाद राजभोज यांनी विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे सेवन केल्याने आपले पोटातील कृमी,जंत यांचा नायनाट होऊन पोटाचे विकार दूर होऊन आपले आरोग्य चांगले राहते पचनक्रिया सुधारते म्हणून शासनाच्या या योजनेचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न करावा.या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना गोळ्यांचे वाटप केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उषा जाधव,मंगला पाटील, भारती शेवाळे, रविकांता वसावे, संदिप पाटील,कुणाल सोमवंशी, सोनाली पाकळे, नितिन गलराह, यांनी परिश्रम घेतले.