नंदुरबार l प्रतिनिधी
विखरण विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी गटाच्या शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला असून, सर्व १२ जागांवर विजयाची मोहोर उमटवली आहे.
नंदुरबार तालुक्यातील विखरण विविध कार्यकारी सहकारी संस्थेची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणुक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत होते.परंतु, सामंजस्याने झाल्याने प्रत्यक्ष निवडणूक घेण्यात आली. शिवसेनेचे नेते तथा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी गटाच्या शेतकरी विकास पॅनल व भाजपप्रणीत पॅनलमध्ये सरळ लढत रंगली होती. निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलची १ जागा यापूर्वीच बिनविरोध झाली.
विखरण येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. मतदारांमध्ये देखील उत्साह दिसून येत होता. मतदानानंतर मतमोजणी अंती भाजपप्रणित पॅनलच्या पराभव करीत शेतकरी विकास पॅनलचे ११ उमेदवार दणदणीत मतांनी विजयी झाले. यावेळी शेतकरी विकास पॅनलच्या समर्थकांनी जल्लोष केला. बापू विश्राम पाटील, दादाभाई फुला पानपाटील, मिनाबाई अशोक पाटील,शेवंता फुला पाटील, गोरख वामन पाटील,चंद्रभान विनायक पाटील,नाना धूडा पाटील,प्रकाश राजाराम पाटील, प्रवीण साहेबराव पाटील, संतोष नामदेव पाटील,भाग्योदय रमेश पाटील,राजेंद्र गोविंद साळुंखे हे उमेदवार निवडून आले आहेत. सर्व विजय उमेदवारांचे शिवसेनेचे नेते,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी व जि.प.उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी अभिनंदन केले आहे.