Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा रँगिगबाबत होणारे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन

team by team
April 19, 2022
in शैक्षणिक
0
नंदूरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा रँगिगबाबत होणारे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन

नंदुरबार l प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून नंदुरबार येथे नव्याने १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास शासनाने तसेच राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांनी मान्यता प्रदान केली असून शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मध्ये राज्य कोट्यातील ८५ व ऑल इंडिया कोट्यातील १५ विद्यार्थ्यांपैकी १४ असे नवीन एकूण ९९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. या नवीन प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांकरीता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक व राष्ट्रीय विज्ञान आयेाग, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार अधिष्ठाता यांचा विद्यार्थ्यांना संदेश हा कार्यक्रम  नुकताच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,नंदुरबार येथे संपन्न झाला.
या कार्यक्रमास शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, शरीरक्रियाशास्त्र विभाग प्रमुख तथा उपअधिष्ठाता डॉ.गिरीष ठाकरे, शरिररचनाशास्त्र विभागाचे डॉ.आनंद जामकर सहयोगी प्राध्यापक डॉ.चंद्रशेखर डांगे, डॉ.हरीष वानखेडे, डॉ.अमोल किंनगे, डॉ.दिप्ती निमजे, डॉ.अमरसिंग हजारी, डॉ.रुपल गिरासे, डॉ.प्रशात पाटील, डॉ.स्मिता गायकवाड, ग्रंथपाल किशोर शेळके, वरीष्ठ सहायक सुकेश पाडवी, तंत्रज्ञ गणेश चित्ते, लघुलेखक साहेबराव मोरे, कार्यालयीन अधीक्षक दिलीप पावरा आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ.शिवाजी सुक्रे यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांना चांगले डॉक्टर होण्यासोबत एक चांगले व्यक्ती म्हणून समाजात पुढे यावे. तसेच समाजात वावरतांना वरीष्ठांचा योग्य आदर केला पाहिजे. भावी आयुष्यातील जीवनात  कोणत्याही अडीअडचणी आल्यास त्याला सामोरे जावून न डगमगता पुढे जायला हवे असे त्यांनी सांगितले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना रॅगिंग प्रतिबंधात्मक कायदा, महिला अत्याचार निवारण तसेच संस्थेविषयी माहिती दिली. महाविद्यालयात मुलांसाठी वसतिगृह, उपहारगृहाची सुविधा नसल्याने पर्यायी व्यवस्था सुरु करण्यात बाबत तसेच मुलीच्या वसतीगृहात व्हायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.गिरीष ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना रँगिगबाबत होणारे दुष्परिणाम, विद्यापीठ परीक्षेचे अंतर्गत मुल्यमापन व अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. तसेच रँगिग सारखे प्रकार घडल्यास तात्काळ अध्यापक किंवा संस्थेचे अधिकारी, कर्मचांरी यांना त्वरीत माहिती द्यावी जेणेकरुन याअशा प्रकारास वेळीच आळा घालता येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.
डॉ.आनंद जामकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त स्वत:चे मानसिक संतुलन सांभाळण्यासाठी आवडते छंद जोपासावे, स्किल डेव्हलपमेंट, मैदांनी खेळामध्ये सहभागी होऊन मन प्रसन्न व शरीरयष्टी सुदृढ ठेवण्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून रोहन गुणके संस्थेविषयी आपले मत मांडतांना म्हणाला की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशापुर्वी खाजगी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता त्याठिकाणी असलेले अधिकचे शुल्क तसेच इतर शुल्क हे न परवडणारे होते. परंतू आमचा प्रवेश शासकीय महाविद्यालयात झाला व प्रवेशावेळी अध्यापक व कर्मचारी यांनी खुप चांगले सहकार्य केल्याबद्दल महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.रुपल गिरासे तर आभार प्रदर्शन डॉ.प्रशात पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

विद्याश्रम परिसर विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग २०२१ साठी सज्ज, आज युवारंगचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन

Next Post

नंदूरबार येथे वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, शाश्वत तंत्रज्ञान आदिवासी केंद्राचे उद्घाटन

Next Post
नंदूरबार येथे वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, शाश्वत तंत्रज्ञान आदिवासी केंद्राचे उद्घाटन

नंदूरबार येथे वन हक्क व पेसा सूक्ष्म नियोजन आणि संसाधन व्यवस्थापन केंद्र, शाश्वत तंत्रज्ञान आदिवासी केंद्राचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add