Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विद्याश्रम परिसर विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग २०२१ साठी सज्ज, आज युवारंगचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन

team by team
April 19, 2022
in शैक्षणिक
0
विद्याश्रम परिसर विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग २०२१ साठी सज्ज, आज युवारंगचे मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन

खेतिया l प्रतिनिधी
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवच्या विद्यार्थी विकास विभाग व शहादा येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव युवारंग 2021 चा उदघाटन सोहळा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे कुलगुरू प्रा.डॉ.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे राहतील.


या युवारंगासाठी 106 महाविद्यालयांनी नोंदणी केली असून विद्यार्थ्यांसह, सहायक व संघ व्यवस्थापक असे एकूण 1470 जणांचा सहभाग राहणार आहे यात 502 विद्यार्थी तर 586 विद्यार्थीनिंचा समावेश आहे. साथ संगत देणाऱ्यात 95 व्यावसायिक तर 75 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्येकी 106 पुरुष व महिला संघ व्यवस्थापकांची नोंद झाली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या विशेष संकल्पनेवर आधारित युवक महोत्सवात पाच रंगमंचावर 28 कला प्रकारात विद्यार्थी आपली कला सादर करतील. मुख्य उदघाटन सोहळा स्वातंत्र्य सेनानी स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील रंगमंच क्रमांक एक वर आज दि. 20 एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात आला आहे. उदघाटक कुलगुरू प्रा.डॉ.व्ही. एल. माहेश्वरी हे असून अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील हे राहतील. यावेळी शहादा तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी, मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगांवचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, जिल्हा परिषद सदस्या सौ.जयश्रीताई पाटील यांची उपस्थिती राहील. उपस्थितीतीचे आवाहान मंडळाचे समन्वयक प्रा. मकरंद पाटील, विद्यापीठाचे प्र.कुलसचिव प्रा.के. एफ. पवार, युवारंगचे कार्याध्यक्ष तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य दीपक बंडू पाटील, विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ.सुनिल कुलकर्णी, युवारंगचे समन्वयक प्रा.डॉ. आय.जे.पाटील, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, कला, विज्ञान व वाणिज्य वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, युवक महोत्सवात सहभागी होण्यासाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व संघ प्रमुख बुधवारी सकाळपासून विद्याश्रम परिसरात दाखल झाल्याने चैतन्याचे वातावरण दिसून येत होते. नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचे गर्दी झाली तर युवक महोत्सवात सहभागी विद्यार्थी – विद्यार्थीनीसह मार्गदर्शकांची मुक्कामाची व्यवस्था मंडळाच्या विविध वसतिगृहात करण्यात आली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता प्रत्येक रंगमंचावर कुलर लावण्यात आले असून जागोजागी मंडप उभारण्यात आले आहेत. महाविद्यालय परिसरातील स्वागत कमानी तसेच विविध बॅनर लक्ष वेधक ठरले असून दोन ठिकाणी सेल्फी पॉईंट खास विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात आले आहे. आयोजन समितीच्या वतीने बाहेर गावाहून आलेल्या विद्यार्थ्यांचे भोजन व निवासाची चोख व्यवस्था करण्यात आली असून वैद्यकीय पथकासह
ॲबुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय सेवा योजना एककाचा उपक्रमाच्या माध्यमाने स्वयंसेवकांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत महिला सशक्तीकरण, माझी वसुंधरा अभियान, बेटी बचाओ -बेटी पढाओ, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रदूषण, निसर्ग संरक्षण, रक्तदान, सोशल मीडिया, रस्ता सुरक्षा, वेगवेगळ्या विषयांवर पोस्टर्स, रांगोळ्या काढून तसेच परिसरात ठिकठिकाणी फलक लावून विद्यार्थ्यांमध्ये जागृतीचा संदेश देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे सुमारे दोन वर्षांच्या कालखंडानंतर महाविद्यालयीन तरुणाई युवारंग निमित्ताने एकत्रित आले असून त्यांच्यात अत्यंत उत्साहाचे वातावरण दिसत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पोस्ट खात्यात ८२ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी पोस्टमास्टरला न्यायालयाने सुनावली तीन वर्ष कारावासाची व पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा

Next Post

नंदूरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा रँगिगबाबत होणारे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन

Next Post
नंदूरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा रँगिगबाबत होणारे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन

नंदूरबार येथील वैद्यकीय महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा रँगिगबाबत होणारे दुष्परिणाम बाबत मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add